एटीएमचे ग्रहण सुटेना; ठणठणाट कायम!
By admin | Published: May 15, 2017 12:37 AM2017-05-15T00:37:52+5:302017-05-15T00:37:52+5:30
खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर एटीएमची सेवा विस्कळीत झाली ती अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. एकतर एटीएममधील रोख लवकर संपते किंवा त्यात रोख रक्कम टाकलीच जात नाही. रविवारी तर सगळीकडे ठणठणाटच असतो. त्यामुळे पैशांची गरज असलेले नागरिक या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. दुसरा व चौथा शनिवारनंतर येणाऱ्या रविवारी तर परिस्थिती फारच बिकट असते. १४ मे रोजी अशीच परिस्थिती खामगाव शहरात दिसून आली. विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एटीएमचे ग्रहण केव्हा सुटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.