वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:08 PM2018-05-22T22:08:34+5:302018-05-22T22:08:34+5:30

वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले.

Attack on police and the forest staff | वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला  

वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला  

googlenewsNext

बुलडाणा - वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले. ही घटना २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री ८.३० वाजता ११ आदीवासींना पोलिसांनी अटक केली आहे. 
वनपरिक्षेत्र जळगाव जामोदअंतर्गत येणाºया जामोद वतुर्ळातील शिवारात वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या भिलाला व बारेला  या आदिवासींनी अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या वनकर्मचारी व पोलिसांवर दुपारी दगडफेक केली. यामध्ये जळगाव पोलीस उपनिरीक्षक किरडे जखमी झाले. पोलीस कर्मचारी व वनकर्मचारी मेंढामारी शिवारातील वनविभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता प्यारसिंग लढवले, गोपाल मुझेल्दा,  भीलसींग तडवले, सुरेश तडवले, मांगीलाल मुजालदा, शीला तडवले, रायजा तडवले, राजल मुजाल्दा, कुसुम तडवले, रंजना तडवले, बिन्दा तडवले, सताबाई तडवले, अनिल तडवले, भाईलाल भिलाला, बीरलाल तडवले, अंबालाल तडवले, दिलीप तडवले, श्रावण तडवले, विजय तडवळे, बिनाबाई अडवले, चैनीबाई तडवले, करमाबाई तडवले, रिंकी तडवले इतर सात आठ जणांनी हातात कुºहाड दांड्याला गोफण  लावून दगड मारून जखमी केले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अरुण शालिग्राम किरडे व इतर पोलिस व वन विभागाचे एकुण १२ कर्मचारी जखमी झाले. 

पोलिसांचा गोळीबार 
जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. तेव्हा आदीवासी पळून गेले. तरी केलेल्या दगडफेकीत कर्मचारी मात्र जखमी झाले. यातील पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यावर शेगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. काही कर्मचाºयावर खासगी तर काहींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

११ आदीवासींना अटक 
याप्रकरणी वन कर्मचारी सलीम खान गुलशान खान यांच्या तक्रारीवरुन आदीवासींविरुद्ध जळगाव जामोद पोलिस स्टेशनला अपराध नंबर २४२ /१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत.

Web Title: Attack on police and the forest staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.