बुलडाणा येथील उप- प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 02:01 PM2019-07-24T14:01:53+5:302019-07-24T14:01:59+5:30

बुलडाणा: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या स्वीय सहाय्यकास एजंटांकडून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली

Attack on sub-regional transport officer in Buldana | बुलडाणा येथील उप- प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर हल्ला

बुलडाणा येथील उप- प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर हल्ला

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या स्वीय सहाय्यकास एजंटांकडून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दाखल तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या स्वीय सहाय्यकासोबत एजंट सतीश पवार, रंगनाथ पवार व दीपक पवार यांनी वाद घालून मारहाण केली. जयश्री दुतोंडे यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता उपरोक्त तिघांनी त्यांनाही मारहाण केल्याचे त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी रंगनाथ पवार व दीपक पवार यांना अटक केली आहे. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी आरोपी विरोधात विविध कलमान्वये बुलडाणा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजेदरम्यान गुन्हे दाखल केले.
महिला अधिकाºयास मारहाण झाल्याने अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. दीपक पवार यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली असून उप- प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तक्रार चौकशीवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.


बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. महिला अधिकाºयास मारहाण करणे शरमेची बाब आहे. अधिकाºयांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे.
- जयश्री दुतोंडे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Attack on sub-regional transport officer in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.