आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:12+5:302021-05-27T04:36:12+5:30

दुसरीकडे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या जुनागाव परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. दोन अज्ञातांनी ...

Attempt to burn MLA Sanjay Gaikwad's vehicle | आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न

आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न

Next

दुसरीकडे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या जुनागाव परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. दोन अज्ञातांनी दुचाकीवर येऊन त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची सध्या परिसरात चर्चा आहे. या घटनेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशीही आ. संजय गायकवाड यांनी संपर्क साधला असून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण सध्या अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या स्तरावरून हाताळण्यात येत आहे. या प्रकरणी आ. गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी प्रारंभिक माहितीच्या आधारावर अज्ञात व्यक्तींविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही सकाळीच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, आ. संजय गायकवाड हे २६ मे रोजी पहाटे दीड वाजता मुंबईवरून बुलडाण्यात आले होते. त्यानंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या वाहनाच्या इंधनाच्या टाकीजवळचा भाग अज्ञातांनी पेटवून दिला होता. या वाहनांच्या समोर व मागेही वाहने उभी होती. आगीचा भडका उडाला असता, तर परिसरातील तीन ते चार वाहने जळाली असती, असे आ. गायकवाड म्हणाले.

प्रकरणाच्या सहा पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिशेने तपास करण्यात येत आहेत. यामध्ये सायबर सेलचे दोन, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन, शहर पोलीस ठाण्याचे दोन आणि जिल्हा विशेष शाखेच्या दोन पथकांचा समावेश आहे. दुसरीकडे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या. सोबतच राजकीय वैमनस्य असलेल्या भाजपच्या एका नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयासमोरही पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

--पथके गठीत--

प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथके गठीत केली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही तपासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरियांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Attempt to burn MLA Sanjay Gaikwad's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.