धाडचीच पुनरावृत्ती देऊळघाटमध्ये करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:43+5:302021-03-04T05:04:43+5:30

सरपंचपद मिळविले. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याचीच पुनरावृत्ती माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ देऊळघाटमध्ये करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ...

Attempt to repeat Dhadchi in Deulghat | धाडचीच पुनरावृत्ती देऊळघाटमध्ये करण्याचा प्रयत्न

धाडचीच पुनरावृत्ती देऊळघाटमध्ये करण्याचा प्रयत्न

Next

सरपंचपद मिळविले. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याचीच पुनरावृत्ती माजी आमदार

हर्षवर्धन सपकाळ देऊळघाटमध्ये करण्याचा प्रयत्न करीत

असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य लहाने यांनी केला आहे.

देऊळघाट ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारीला होती. अनुसुचित जाती महिलांचे

आरक्षण होते. त्या दिवशी ग्रामपंचायतचे सर्व उमेदवार उपस्थित होते. त्या दिवशी एकाही महिलेने अनुसुचित

जाती (महिला) या प्रवर्गाचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अनुसुचित जाती

महिला आरक्षण बदलुन केवळ अनुसुचित जाती असे केले. २६ फेब्रुवारीला परत सरपंचपदाची निवडणूक

लावली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी २६ फेब्रुवारीच्या निवडणुकीला हरकत घेऊन ती निवडणूक स्थगित करण्यासाठी दबाब टाकला. आज तेच माजी आमदार एका महिलेचे अनुसुचित जातीचे बनावट प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य लहाने यांनी केला आहे. या महिलेकडे अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र असते, तर त्या महिलेने ते प्रमाणपत्र ९ फेब्रुवारीलाच सादर केले असते. ज्या महिलेने ते बनाबट प्रमाणपत्र आणले आहे, त्या महिलेची जात अनुसुचित जाती प्रवर्गात मोडत नाही. एकंदरीत खोटे-नाटे दस्तऐवज तयार केल्याचा मुद्दाही डी. एस. लहाने यांनी उपस्थित केला आहे.

बुलडाणा तहसील कार्यालयांतर्गत बोगस प्रमाणपत्रावरून कारभार होत असल्याचे आढळून आले आहे. बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेणाऱ्यांचे सदस्यत्व खारीज करावे. लहाने यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. आपण कुठल्याही चुकीच्या कामांना पाठबळ देत नाही.

हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार, बुलडाणा.

Web Title: Attempt to repeat Dhadchi in Deulghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.