बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 05:07 AM2021-11-20T05:07:33+5:302021-11-20T05:15:39+5:30

१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Attempt to set fire to tehsildar's vehicle in Buldana, police rushed | बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

googlenewsNext

बुलडाणा : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कापूस व सोयाबीन प्रश्नी आंदोलन चिघळलेले असतानाच शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बुलडाण्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.सुदैवानी कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. वाहन जाळण्याचा प्रयत्न करताना तहसिल कार्यालयातील एकाने बघितल्याने हा संपुर्ण प्रकार समोर आला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले होते. १०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

अज्ञात व्यक्तींनी तहसिल कार्यालयात रात्री साडेदहाच्या सुमारास प्रवेश करत तहसिलदारांच्या वाहनाच्या मागील चाका जवळ ज्वलनशील द्रवाची बॉटल फोटून या वाहनास आग लावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसिल कार्यालयात रात्र पाळीवर असलेल्या एकाने हा प्रकार बघीतला. त्याने आवाज करताच अज्ञात आरोपींनी त्वरित तेथून एका दुचाकीवर पलायन केल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. या परिसरात दोन इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले असल्याने आरोपी त्यामध्ये चित्रबद्ध झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांना शक्य होणार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितल्यानुसार दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या होत्या.

ठाणेदार प्रदीप साळुंके यांनीही आपल्या सहकाऱ्ऱ्यांसह घटनास्थळ गाठत पाहणी केली. मात्र अनुषंगीक विषयान्वये या विषयासंदर्भात माहिती देण्यात नकार दिला. अद्याप आमच्याकडे तक्रार आली नसल्याचे ते म्हणाले. तक्रार आल्यानंतर नेमके प्रकरण काय आहे, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
दुसरीकडे शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या घरासमोर सुरू असलेल्या त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान काही अज्ञातांनी पोलिसांच्या वाहनासह एका रुग्णवाहिकेवर दगडफेक करीत नुकसान केले होते. त्यानंतर हा प्र्कार रात्री ११ वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय परिसरात घडला. दरम्यान मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यानजीकही एका ट्रकला आग लावण्यात आली असल्याची माहिती आहे.

आजच भरले होते डिझेल
विशेष म्हणेज तहसिलदाराच्या शासकीय वाहनात १९ नोव्हेंबर रोजीच डिझेल भरण्यात आले होते. सुदैवाने या वाहनास आग लावण्याचा प्रकार वेळीच समोर आला नसता तर प्रसंगी तहसिल कार्यालय परिसरात मोठा अनर्थ घडला असला, असे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: Attempt to set fire to tehsildar's vehicle in Buldana, police rushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.