पत्नीचा ओढणीने गळा आवळून राजूर घाटात जीवे मारण्याचा प्रयत्न; अकोल्यातील एकास अटक
By निलेश जोशी | Published: October 25, 2023 05:35 PM2023-10-25T17:35:00+5:302023-10-25T17:35:13+5:30
होमगार्डच्या सतर्कतेने अनर्थ टळला
बुलढाणा: मुळचा जळगाव जामोद तालुक्यातील परंतू काही कालावधीपासून अकोल्यातील जुन्या शहरात खैर मोहमद प्लॉट परिसरात रहाणाऱ्याने एकाने घटस्फोट देण्याच्या निमित्ताने लिखापडी करावयाची आहे असे सांगून पत्नीस बुलढाणा शहारनजीकच्या राजूर घाटात देवीच्या मंदीराच्या पाठीमागील जंगाल नेत तेथे अेाढणीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतू पीडित महिलेने आरडाअेारड केल्याने नजीकच असलेल्या दोन होमगार्डनी धाव घेत महिलेचा जीव वाचविल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जुना अकोला येथील आरोपी शेख इब्राहीम शेख चाँद यास बुलढाणा शहर पोलिसानी अटक केली आहे. दरम्यान त्यास २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयत हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी नजमा सय्यद मुस्तफा (३०, रा. भगतवाडी, नुरी प्लॉट गल्ली क्र. ४) या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी २४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार नजमा सय्यद मुस्तफा हीला तिचा पती शेख इब्राहीम शेख चाँद याने घटस्फोट (तलाख) देण्यासाठी लिखापडी करावयाची असल्याने दुचाकीवर दोन मुलांसह बसून आणले होते. दरम्यान बाळापूर येथे दोन्ही मुलांना ठेवून त्याने नजमा सय्यद मुसत्फाला खामगाव मार्गे बुलढाणा येथे व तेथून मलकापूर मार्गावरील राजूर घाटात नेले. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राजूर घाटातील देवीच्या मंदीराजवळ जंगलात नेत तेथे अेाढणीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाअेारड केल्याने तेथे जवळच पोलिस चौकीत असलेल्या दोन होमगार्डनी धाव घेत महिलेला त्याच्या तावडीतून सोडविले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
होमागार्ड व दोन मुलींनी वाचविले प्राण
सायंकाळी आरोपी शेख इब्राहीम शेख चाँद याने पत्नी नजमाला राजूर घाटातील मंदीराजवळ असलेल्या टेकडीवर नेले. तेथे तिचा अेाढणीने गळा आवळून खून करण्याचा त्याने प्रयत्न गेला. त्यावेळी नजमाने आरडा आरेड केली. देवीच्या मंदीराजवळ असलेल्या पोलिस चौकीत बसलेल्या दोन होमगार्डनी महिलेचा आवाज एकला व त्या दिशेने ते पळाले. यावेळी धावण्याच्या सरावासाठी घाटात आलेल्या दोन मुलींनीही त्यांना मदत केली. या घटनाक्रमादरम्यान महिला मात्र बेशुध्द पडली होती, अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली.