जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यात चाेरीचा प्रयत्न; बुलढाण्यात चाेरट्यांचा हैदाेस
By संदीप वानखेडे | Published: June 17, 2024 05:18 PM2024-06-17T17:18:21+5:302024-06-17T17:21:47+5:30
या प्रकरणी दाेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप वानखडे,बुलढाणा : शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. चाेरट्यांची हिंमत वाढल्याने थेट जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यातच चाेरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दाेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. विष्णूवाडी येथील शासकीय बंगल्यात राहणारे न्यायाधीश ए. एम. मगरे यांच्या बंगल्यातून तस्करांनी चंदनाचे झाडच कापून नेल्याची घटना ६ मे राेजी घडली हाेती. तसेच तीन दिवस आधीच जिल्हा पोलीस मुख्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन वसाहतीच्या इमारतीतून दाेन लाख ९१ हजार रुपयांचा साहित्य लंपास करण्यात आले हाेते. आता जिल्हा व सत्र न्यायाधीश खटी यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न झाला आहे़
याबाबत फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज रमेश गायकवाड यांनी १६ जूनला बुलढाणा शहर पाेलिसांत दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांची दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश खटी यांच्या निवासस्थानी ड्यूटी सुरू असताना कोर्टाचे शिपाई शेळके यांनी आवाज दिला. यावेळी ते त्यांच्याकडे गेले तेव्हा शिपाई शेळके याने सांगितले की, दाेन महिला निवासस्थानाच्या भिंतीवरून आतमध्ये आल्या आहे. तेथे गेलो व त्या महिलांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना निवासस्थान परिसरात येण्याचे कारण विचारले असता त्याबाबतसुद्धा समाधानकारक उत्तर दिले नाही. दोन्ही महिला स्टोअर रूममध्ये काहीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी आरोपी आशा दिलीप लावाडकर आणि अरुणा रमेश लावाडकर (रा. माहोरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.