मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:53 PM2017-09-27T20:53:26+5:302017-09-27T20:53:31+5:30

लोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.

The auctioneer of the post of sarpanch at Mohootkhed | मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंचपद विकल्या गेले ४ लाख २१ हजारात

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.
लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुकीमध्ये वेगळेच रूप धारण केले असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. याबाबत आचारसंहीताचा भंग केल्याप्रकरणी लहुशक्ती संग्राम परिषद महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर सरपंच पदाचा लिलाव करणाºयांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत व ३३९ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणुक सुरू आहे. लोणार तालुक्यातील मोहोतखेड, निजामपुर, मातरखेड या तीन गाव मिळून एक  गटग्रामपंचायत आहे. सर्वात जास्त मतदान हे मोहोतखेड येथे असल्यामुळे या गावामध्ये सरपंच पदाचा जाहीर लिलाव झाल्याची घटना समोर आली आहे. या गावातील नेते मंडळीनी खुलेआम चावडीवरील लाउडस्पीकरवर सरपंच पदाचा लिलाव असल्याचे सांगुन लोकांना चावडीवर बोलाविले व सरपंच पदाचा लिलाव करुन लोकशाहीचे वाभाडे काढले. यामध्ये सर्वात अधिक बोली ४ लाख २१ हजार रुपये ठरली. मात्र मोहोतखेड या गावातील नेत्यांनी ईतर गावातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी मतदान जास्त असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेतला व त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज सादर केले. मात्र याबाबतची माहीती निजामपुर व मातरखेड येथील नागरिकांना लागताच त्यांनी याबाबत लहुशक्ती संग्राम परिषदेचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर समाधान साठे यांनी नामनिर्देशन छाणनीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन देउन सदर प्रक्रिया रद्द करून आचारंसहीतेचा भंग केल्याप्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुका दडपशाही मार्गाने होत आहे. त्यामुळे जाहीर लिलाव करून अवैधरित्या सरपंच पदाचा उमेदवार ठरविणाºयांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

Web Title: The auctioneer of the post of sarpanch at Mohootkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.