ऑटोरिक्षाचालकांना आता पांढरा गणवेश!

By admin | Published: March 22, 2016 02:27 AM2016-03-22T02:27:49+5:302016-03-22T02:27:49+5:30

प्रादेशिक परिवहन विभागाची अधिसूचना; आदेशाला परिवहन कार्यालयाकडून केराची टोपली!

Autorickshaw drivers now white uniform! | ऑटोरिक्षाचालकांना आता पांढरा गणवेश!

ऑटोरिक्षाचालकांना आता पांढरा गणवेश!

Next

बुलडाणा : ऑटोरिक्षा चालकांना आता ह्यखाकीह्ण पोशाखाऐवजी पांढरा पोशाख घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने ही अधिसूचना काढली असून, अद्याप यावर कोठेच अंमलबजावणी सुरू करण्यात आली नाही. बुलडाणा जिल्ह्यात लवकरच या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागात चालणार्‍या प्रवासी टॅक्सी व ऑटोरिक्षा चालकांना ह्यखाकीह्णऐवजी पांढरा पोशाख घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या आदेशाची बुलडाणा जिल्ह्यात अंमलबजावणी शून्य आहे. या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे आरटीओचे अधिकारीसुद्धा कार्यवाही करीत नाही. या संदर्भाची शासनाने अधिसूचना काढली होती. तसे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना यापूर्वीच पाठविले आहे. मात्र, सदर परिपत्रकाला परिवहन विभागाने केराची टोपली दाखवली असून, कोठेच या आदेशाचे पालन करण्यात येत नाही. मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३८ पोट कलम (२) खंड, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ यांच्या नियम २१ मधील उपनियम (१८) नुसार ह्यखाकीह्ण पोशाखात बदल करून पांढरा पोशाख घालणे अनिवार्य केले आहे, असे या आदेशात म्हटले आहे. शासनाचे अपर मुख्य सचिव गौतम चॅटर्जी यांनी ही अधिसूचना जारी केली होती. परंतु या आदेशाला पाच महिने होऊनही अंमलबजावणी झाली नाही. शहरातील ऑटोचालक ह्यखाकीह्ण पोशाखच घालत आहेत. अनेक ऑटोचालक तर खाकी पोशाखही घालत नाही. या ऑटोचालकांना आता बॅच बिल्लाऐवजी ओळखपत्र मिळणार आहे.

Web Title: Autorickshaw drivers now white uniform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.