भूजल पातळीत सरासरी दीड मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 04:44 PM2019-12-01T16:44:50+5:302019-12-01T16:45:11+5:30
बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वाषिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याची भुजल पातळी १.३९ मिटरने वाढल्याचे स्पष्ट झाले असले तरी देऊळगाव राजा, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.
वर्षभरात साधारणत: चार वेळा भूजल पातळीची तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यानुषंगाने ही तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. प्रामुख्याने १.११ मीटर ते ७.६० मिटर दरम्यान ही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहीरींची पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्याची भूजल पातळी ही उणे ०.०८, लोणारची उणे ०.१५ आणि सिंदखेड राजाची उणे ०.४५ मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात उन्हान्यात प्रसंगी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात होणाऱ्या भुजल पातळीच्या तपासणीत सरासरी भुजल पातळीची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उन्हाळ््यात कोणत्या तालुक्यात प्रसंगी पाणीटंचाी निर्माण होईल, याचा अंदाज बांधणे शक्य होईल, असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात यावर्षी फारसी टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागाक अॅक्वीफोर (जलधर खडक) नसल्याने त्या भागात टंचाईची शक्यता नाकारता येत नाही.
टंचाई आराखडा ४.७३ कोटींचा
जिल्ह्यात परतीच्या पावसाने यंदा उच्चांक गाठल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा हा ४.७३ कोटींच्या घरात आहे. गतवर्षी हाच टंचाई कृती आराखडा सातत्याने वाढत होता. गेल्या वर्षी तब्बल ४९ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च यावर झाला आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ ते जून २०२० पर्यंतचा यंदाचा टंचाई कृती आराखडा पुर्णत्वास गेला असून जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यावर शिक्का मोर्तब केले आहे. डिसेंबर अखेर जिल्ह्यातील २१ गावात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचया २६ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.
एप्रिल-जूनमध्ये ३३६ गावात टंचाई
जानेवारी मार्च दरम्यान जिल्ह्यातील ९२ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. दरम्यान, एप्रील ते जून अखेरपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता ही ३३६ गावात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यादृ्ष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे.