वारसाच्या नोंदीसाठी तलाठ्याकडून दहा महिन्यांपासून टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:31+5:302021-09-18T04:37:31+5:30
तालुक्यातील मंडपगाव येथील संजय चिंधाजी कदम यांच्या मालकीची असलेली गट नं ३०७,३०० मधील अनुक्रमे ७१ आणि ७६ आर ...
तालुक्यातील मंडपगाव येथील संजय चिंधाजी कदम यांच्या मालकीची असलेली गट नं ३०७,३०० मधील अनुक्रमे ७१ आणि ७६ आर असे १ हेक्टर ४७ आर जमीन वारस हक्काने लावण्यासाठी आवश्यक ती दस्तावेज देऊन मंडपगाव येथील तलाठी संजय तुळशीराम हांडे यास वारस नोंदीसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये तलाठी हांडे यांच्या ठरलेल्या आठ हजार रुपयांची मागणी केली होती असे अर्जदार यांनी म्हटले आहे. मागणीनुसार दस्तावेजासोबतच देऊळगाव मही येथील सेंट्रल बँकेसमोर सहा हजार रुपये दिले. वारसांच्या नोंदीबाबत वारंवार कदम यांनी तलाठी हांडे यांना विचारणा केली. मात्र, दीड महिन्यात वारसांची नोंद करणे बंधनकारक असताना गेली दहा महिने होऊनही वारसांची नोंद झाली नसल्याने तहसीलदार देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित नोंदीविषयी आदेश द्यावे, असे निवेदन कदम यांनी केले.