बुलडाणा जिल्ह्यात कलापथकाकडून ‘बेटी बचाव’ चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:40 PM2018-03-22T14:40:27+5:302018-03-22T14:40:27+5:30
बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे.
बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार तथा गीत नाटक प्रभाग पुणे यांच्यावतीने आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणा यांचे सनियंत्रणात शाहीर डी.आर.इंगळे आणि संच यांचा ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ कलापथकाचे माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर कार्यक्रम बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, दे.राजा या तालुक्यात कलापथकाचे कार्यक्रम झाले आहेत. कलापथकाच्या प्रभावी जनजागृतीमुळे ‘बेटी बचाव’ अभियान शासनाद्वारे मर्यादीत न राहता सर्व सामान्य जनतेला त्यांचे महत्व पटायला लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात सुधारणा झाली आहे. हे अभियान लोकसहभागामुळे अधिक गतीमान करुया, असे आवाहन शाहीर इंगळे कलापथकाचे माध्यमातून करित आहेत. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी गांवचे सरपंच पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका गावातील मान्यवर व्यक्तीकडून सहकार्य मिळत आहे.