भटके विमुक्त संघर्ष परिषदेची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 03:25 PM2018-11-26T15:25:17+5:302018-11-26T15:25:29+5:30

खामगाव :  भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

Awairness Rally of the Bhatke Vukta Sangram Parishad | भटके विमुक्त संघर्ष परिषदेची जनजागृती रॅली

भटके विमुक्त संघर्ष परिषदेची जनजागृती रॅली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे सोमवारी खामगावात आगमन झाले असता, गांधी चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी खा. जतीराम बर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भटके- विमुक्तांना न्याय देण्यासाठी जनजागृती रॅली आयोजित केली आहे. यामध्ये केंद्र शासनाच्यावतीने आयोजित इदाते आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच भटके विमुक्तांना घटनात्मक संरक्षण आदी १३ मागण्यांचा समावेश आहे. खामगाव येथील गांधी चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काँग्रेस पदाधिकाºयांनी जनजागृती रॅलीचे जोरदार स्वागत केले. सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या या रॅलीचे नेतृत्व  दिनानाथ वाघमारे करीत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या भटके विमुक्त जमाती विरोधात भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्यावतीने लढा तीव्र करण्यात आला आहे.

Web Title: Awairness Rally of the Bhatke Vukta Sangram Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.