‘ज्ञानगंगा’तील हिल्या ट्रॅप कॅमेरा प्राणी गणनेच्या निष्कर्षाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:25+5:302021-05-01T04:33:25+5:30

भारतीय वन्यजीव संस्था आणि महाराष्ट्र वनविभागाच्या अर्थसाहाय्यातून ‘लाँग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’ या उपक्रमांतर्गत ही प्राणी गणना आणि सर्वेक्षण ...

Awaiting the conclusion of the Hillaya Trap Camera Animal Census in 'Gyanganga' | ‘ज्ञानगंगा’तील हिल्या ट्रॅप कॅमेरा प्राणी गणनेच्या निष्कर्षाची प्रतीक्षा

‘ज्ञानगंगा’तील हिल्या ट्रॅप कॅमेरा प्राणी गणनेच्या निष्कर्षाची प्रतीक्षा

Next

भारतीय वन्यजीव संस्था आणि महाराष्ट्र वनविभागाच्या अर्थसाहाय्यातून ‘लाँग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’ या उपक्रमांतर्गत ही प्राणी गणना आणि सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात ४ मार्चपासून यास सुरुवात झाली होती. १७० ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे ही गणना जवळपास २५ दिवस चालली होती. सोबतच ट्रॅन्जेक्ट सर्वेक्षणही करण्यात आले होते. गेल्या वर्षभर टिपेश्वरमधून आलेल्या टी१सी१ वाघाचा ज्ञानंगगा अभयारण्यात अधिवास होता. सध्या त्याचे नेमके ठिकाण स्पष्ट नसले तरी त्याच्या येथील काही काळाच्या वास्तव्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यास महत्त्व प्राप्त झाले होते.

दरम्यान, विदर्भातील ताडोबा, नवेगाव, नागझिरा, पेंच, बोर या व्याघ्र प्रकल्पांसह घोडदरी, टिपेश्वर, पैनगंगा, ज्ञानगंगा, लोणार, काटेपूर्णा, कारंजा सोहळसह प्रादेशिक विभागाच्या पांढरकवडा व ब्रह्मपुरीच्या जंगलातही अशाच पद्धतीने प्राण्यांचे अध्ययन केल्या गेले आहे. या सर्व ठिकाणची छायाचित्र तथा तत्सम माहितीचे विश्लेषण सध्या करण्यात येत असून, भारतीय वन्यजीव संस्था याचा एकत्रित अहवाल नंतर प्रकाशित करणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने बिबटे व वाघ यांच्या शरीरावरील खुणांवरून विशिष्ट क्षेत्रात किती बिबटे व वाघ आहेत हे छायाचित्रांच्या साहाय्याने गणनेतून स्पष्ट होणार आहे. यासोबतच संबंधित प्राण्यांची या माध्यमातून एक ओळखही निर्माण होणार आहे.

--ट्रॅन्जेक्ट सर्वेक्षणही झाले--

ज्ञानगंगा अभयारण्यात मार्च महिन्यात ट्रॅन्जेक्ट सर्वेक्षणही झाले होते. प्रत्यक्ष जंगलात पाहणी करून दोन किमीच्या रेषेत किती प्राणी आढळले याचीही माहिती संकलित करण्यात आली होती. तृणभक्षी प्राण्यासंदर्भात सहा दिवस हे सर्वेक्षण झाले होते.

Web Title: Awaiting the conclusion of the Hillaya Trap Camera Animal Census in 'Gyanganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.