नियमित कर्ज भरणारे अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:27 AM2020-12-26T04:27:15+5:302020-12-26T04:27:15+5:30
शासनाने नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. नियमित कर्जदारांनादेखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा ...
शासनाने नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. नियमित कर्जदारांनादेखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे. वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो, मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शैतकऱ्यांचीदेखील परिस्थिती फार चांगली नाही. परंतु या शेतकऱ्यांची मानसिकता सकारात्मक असल्याने कोणतेही अडचण आली तरी त्यांनी आपल्या कर्जाचा भरणा वेळेत केला आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. परंतु शासनाने च कर्जदारांसाठीची घोषणा अंमलात आणली नाही. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी हाेत आहे.