राज्यातील अंगणवाडी सेविका भाऊबीज भेटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:19 PM2020-11-22T17:19:16+5:302020-11-22T17:19:45+5:30

द्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. 

Awaiting the visit of Anganwadi worker Bhaubij in the state | राज्यातील अंगणवाडी सेविका भाऊबीज भेटीच्या प्रतीक्षेत

राज्यातील अंगणवाडी सेविका भाऊबीज भेटीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांना तीन हजार रूपये देण्यात येणार असल्याचा आदेश नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने काढला. मात्र अद्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. 
कोरोना लॉकडाऊनच्या काळात बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करीत अशा विविध अडचणींवर मात करीत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यांमुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.
कोविड-१९ वर मात करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली. यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी झाली. यामुळेच राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय महिला बालकल्याण विभागाच्य वतीने घेण्यात आला. तसेच गटप्रवर्तकांनाही तीन हजार रूपये देण्यात येणार आहे. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांना तीन हजार रूपये देण्यात येणार असल्याचा आदेश नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने काढला. मात्र अद्याप अंगणवाडीसेविकांना भाऊबीज भेट मिळाली नाही. शासनासोबतच जिल्हा व तालुका स्तरावरही अधिकाºयांकडून उदासिन धोरण स्वीकारले आहे. 
- पंजाबराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष, सीटू संघटना

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी भाऊबीज भेट म्हणून देण्यासाठीचा निधी कोषागारामध्ये दिला आहे. एक दोन दिवसात हा निधी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना मिळेल. 
- सचिन पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी

Web Title: Awaiting the visit of Anganwadi worker Bhaubij in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.