पथनाट्यातून मतदान जागृतीचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:52+5:302021-01-13T05:29:52+5:30
हिवरा आश्रम: येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने औरंगाबाद येथील टीम तरुणाईने पथनाट्य ...
हिवरा आश्रम: येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने औरंगाबाद येथील टीम तरुणाईने पथनाट्य सादर केले.
टीम तरुणाईच्या सदस्यांनी ग्रामस्थांना पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पथनाट्यातील संवाद व घोषवाक्य देवून पटवून सांगत मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले. मतदानाबाबात जागृती करण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजाविण्यात कुठल्याच प्रकारची हयगय किंवा टाळाटाळ करू नये. लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता नक्की मतदान करा, असे आवाहन यावेळी टीम तरुणाईने ग्रामस्थांना केले. टीम तरुणाई आयोजित लोकधारा महाराष्ट्राची कलामंच, औरंगाबाद प्रस्तुत मतदान मतदान जागृती अभियानमधील तरुणांनी सादर केलेल्या पथनाट्याला लोकांची पसंती मिळाली. येत्या १५ जानेवारीला राज्यात मतदान होणार आहे. यात मतदानाच्या जागृतीसाठी लोकांना प्रबोधनासाठी पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्याचे काम टीम तरुणाई करीत आहे. या पथनाट्यात मतदान का करावे, कोणाला करावे , उमेदवार कसा असावा, ग्रामपंचायतची भूमिका काय आहे आदी विषयांवर प्रबोधन करण्यात आले. या पथनाट्यात अजय भुजबळ, ढोलकीवादक विकी पवार, करण गुडेवार,चंदू तोरणे, शुभम कळसकर यांचा समावेश होता.