देऊळगाव राजात रक्तदानाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:04+5:302020-12-24T04:30:04+5:30

सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये विविध स्तरातून रक्तदानाचे महत्त्व पटवून देणारी जनजागृती करण्यात ...

Awareness about blood donation in Deulgaon Raja | देऊळगाव राजात रक्तदानाविषयी जनजागृती

देऊळगाव राजात रक्तदानाविषयी जनजागृती

Next

सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये विविध स्तरातून रक्तदानाचे महत्त्व पटवून देणारी जनजागृती करण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रक्तदान करणे हे सामाजिक दायित्व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी तसेच नागरिकांनी अंगीकारावे, असा संदेश देणारे बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त युवकांनी या सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही या वेळेस करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमादरम्यान पत्रकार सन्मती जैन, वसंतअप्पा खुळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली तेलगड, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, महिला सहकार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले, महाविद्यालयातील प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका उपस्थित होते.

Web Title: Awareness about blood donation in Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.