मासरूळ येथे डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:17+5:302021-06-26T04:24:17+5:30

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशक विशेषत: डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा रोगांच्या नियंत्रणासाठी आराेग्य ...

Awareness about dengue and malaria at Masrul | मासरूळ येथे डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती

मासरूळ येथे डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती

Next

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशक विशेषत: डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा रोगांच्या नियंत्रणासाठी आराेग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली़ या मोहिमेत आरोग्यविषयक हस्तपत्रिकेचे वाटप करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावे आदी माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावात मलेरिया व डेंग्यू या आजाराबाबत जनजागरण मोहीम डेंग्यू जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली़ यामध्ये गृहभेटी देऊन, कंटेनर सर्वेक्षण करून, घरातील सांडपाण्याची भांडी पाहण्यात आली़ यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, सरपंच शकुंतला महाले, उपसरपंच रुक्‍मीनबाई काटोले, ग्रामपंचायत सदस्य शेषराव सावळे, संगीता उगले, ताराबाई फुसे, सुरेखा देशमुख, शिवगंगा पवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते़ डॉ. सरकटे, आरोग्य सेवक के. के. सावळे, आशा सेविका आशा सुरडकर, रेखा गायकवाड, कविता कापरे, वंदना शिंदे यांनी परिश्रम घेतले़

डासांचे उत्पत्तीस्थान नष्ट करा

पावसाळ्यात डेंग्यूचा आजार पसरण्याची भीती असते़ डेंग्यू, मलेरिया या आजारांसाठी डासांच्या जीवन चक्रामध्ये चार अवस्था असून, यापैकी तीन अवस्था पाण्यातील आहे. या तिन्ही अवस्था सहज नष्ट करता येतात़ त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखता येऊ शकते, असे मार्गदर्शन उपस्थितांनी केले़

काेट

तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, डाेळ्यांच्या खाेबणीमध्ये अंगावर पुरळ येणे, नाक, कान, हिरड्यांतून रक्तस्राव हाेणे आदी लक्षणे असल्यास डेंग्यू असू शकताे़ त्यामुळे त्वरित डाॅक्टरांशी संपर्क करावा़

एस़ बी़ चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा

Web Title: Awareness about dengue and malaria at Masrul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.