पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:53+5:302021-03-19T04:33:53+5:30
युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र बुलडाणा यांच्याद्वारे कोरोना आजार व जलशक्ती अभियान, ...
युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र बुलडाणा यांच्याद्वारे कोरोना आजार व जलशक्ती अभियान, पाणी आडवा, पाणी जिरवा या विषयावर जागरूकता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून मेहकर बसस्थानक येथे पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कोरोना आजाराचे त्रिसूत्री नियम, मास्क वापरा, कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती दिली. संसर्गापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी आणी वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पाणी आडवा, पाणी जिरवा याबद्दलही मार्गदर्शन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नयन खरात यांनी केले होते. यावेळी लोकशिक्षण बहुउद्देशीय क्रीडा मंडळ या संस्थेच्या कलाकाराच्या माध्यमातून या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नयन खरात यांनी परिश्रम घेतले.