माकाेडी येथे जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:15+5:302021-07-10T04:24:15+5:30
निमगाव वायाळ रस्त्याची दुरवस्था सिंदखेड राजा : तालुक्यातील किनगाव राजा ते रोहणा फाटा दरम्यान किनगाव राजा ते निमगाव वायाळ ...
निमगाव वायाळ रस्त्याची दुरवस्था
सिंदखेड राजा : तालुक्यातील किनगाव राजा ते रोहणा फाटा दरम्यान किनगाव राजा ते निमगाव वायाळ रस्त्याची मागील सात ते आठ वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याची अक्षरशः खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.
‘एक गाव, एक वाण’ माेहीम यशस्वी करा
बुलडाणा : ‘एक गाव, एक वाण’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कापूस पिकासाठी ९५ गावे निवडण्यात आली आहेत. या गावांमध्ये कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ही माेहीम यशस्वी करावी,असे आवाहन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.
ठिबक सिंचनचे अनुदान अदा करा !
बुलडाणा : ठिबक सिंचन संच खरेदी करण्यासाठी पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक सिंचन संच अनुदानाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,असे आदेश सचिवांनी दिले.
डोणगाव येथे हिवताप जनजागरण मोहीम
डोणगाव : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगाव अंतर्गत डोणगाव, आरेगाव, अंजनी, आंध्रड, लोणी गवळी, पांगरखेड, शेलगाव, गोहगाव या सर्व नऊ उपकेंद्रांमध्ये हिवताप जनजागरण मोहीम राबवण्यात येत आहे.