दिव्यांग दिंडीद्वारे जनजागृती; दिव्यांगांच्या नृत्य, योगा, भजनी मंडळ, देखाव्याने लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:50 PM2019-12-03T13:50:21+5:302019-12-03T13:50:29+5:30
श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृती या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडीत नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, माऊली गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील ,शरदसेठ अग्रवाल, विजयबाप्पू देशमुख, डाॅ मोहन बानोले,न प उपाध्यक्षा सौ ज्योती कचरे, प्रेमलता सोनोने, रजनी पहूरकर,पांडुरंग शेजोळे, अल्काताई खानझोडे,गजानन जवंजाळ, ओम खेतान,अॅड संजय पोकळे,प्रशांत देशमुख,उमेश पाटील, गजानन हाडोळे,अविष्कार संस्थेचे गजानन वाघ, भोजराज पाटील,लक्ष्मणराव खोंड,डाॅ संतोष बोडखे,दत्ता कलोरे,पुरूषोत्तम हाडोळे,अविनाश दळवी,प्रदिप सांगळे, राजु अग्रवाल, ज्ञानेश्वर साखरे, अमित जाधव, डि के शेगोकार,विजय यादव,सौ प्रिती शेगोकार, सौ मंदा घाटोळ आदीसह मान्यवर सहभागी झाले होते. येथील श्री.ग.भी.मुरारका हायस्कुल येथे दिंडीचे उद्घाटन व श्रींच्या पालखीचे पुजन मान्यवर अतिथींचे हस्ते झाले.श्री गजानन महाराज मंदिर परिसरात आ डाॅ संजय कुटे यांचे प्रमुख उपस्थितीत दिव्यांग दिंडिचा समारोप झाला.
दिव्यांगाना आपलंसं करून त्याचे मदतीला धावून यावे, दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे.
- डाॅ संजय कुटे
आमदार,
जळगाव जा विधानसभा मतदार संघ