Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:34 PM2019-11-09T14:34:17+5:302019-11-09T14:34:34+5:30

खामगाव शहरातील संवेदनशील भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे.

Ayodhya Verdict: Police deployed in Khamgaon city! | Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त!

Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव   :  सर्वोच्च न्यायालयाने  अयोध्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर शनिवारी खामगाव शहरासह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, शहरासह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खामगाव शहरातील संवेदनशील आणि प्रमुख वस्त्यांवर पोलिस ड्रोन कॅमेºयावर नजर ठेऊन आहेत.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन तथा पोलिसांचा सोशल मिडिया मॉनिटरींग सेल सतर्क झालेला आहे. खामगाव शहरातील संवेदनशील भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचवेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षण सुनिल आंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र सूर्यवंशी आपल्या पथकासह खामगाव शहरातील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. दुपारी १२ वाजता महावीर चौक तसेच शहरातील इतर चौकांवर ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खामगाव शहरात एसआरपीची एक कंपनी, आरसीपी बुलडाणाचे दोन पथक, शिवाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशनचे ३०० कर्मचारी, १ एएसपी, १ एसडीपीओ, आणि १५ अधिकारी विविध उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशिल आहेत. याशिवाय हेल्मेट, काठी, बॅरिकेटस आणि नळकांड्या आदी साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आहे. एक अ‍ॅब्युलन्स आणि दोन फिरती वाहनेही शहरात तैनात ठेवण्यात आले आहेत.
 
संवदेशील भागावर ड्रोन कमेºयाची नजर!
शहरातील शिवाजी नगर आणि शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जलालपुरा परिसरातील टिळक मैदान, वसतकार डेअरी, मोची गल्ली, बुरड गल्ली, आठवडी बाजार, महावीर चौक, जलालपुरा, वाल्मिक चौक, गौतम चौक, सुदर्शन नगर, सम्राट अशोक नगर, बाळापुर फैल, माखरीया मैदान, शाह नगर, चांदमारी, मेहबुब शाह नगर, शेलोडी रोड, शंकर नगर, गौसुल आझम चौक, बोबडे कॉलनी, स्विपर कॉलनी, हरीफैल मस्जीद, वामन नगर, समता कॉलनी, समन्वय नगर, टिचर कॉलनी, तायडे कॉलनी, मरीअम कॉलनी तसेच शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मस्तान चौक परिसरातील काही भागावर पोलिसांचे ड्रोन कॅमेºयावर नजर राहणार आहे.

 
खामगावात शांतता!
 शहरातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरळीत आहेत. शहरातील महावीर चौक, बसस्थानक चौक, गांधी चौक, मुख्य बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून येत आहे. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिस सुत्रांनी केला आहे.

Web Title: Ayodhya Verdict: Police deployed in Khamgaon city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.