बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:06+5:302021-07-25T04:29:06+5:30
डायबिटिज हा आजार आनुवंशिक असल्याने तो पालकांमार्फत मुलांमध्ये येण्याची शक्यता अधिक असते. बाळ सातत्याने डायपर ओले करीत असेल, त्याला ...
डायबिटिज हा आजार आनुवंशिक असल्याने तो पालकांमार्फत मुलांमध्ये येण्याची शक्यता अधिक असते. बाळ सातत्याने डायपर ओले करीत असेल, त्याला सारखी भूक लागत असेल, तहान लागत नसेल तर पालकांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार काळजी घेतल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळणे शक्य आहे.
आई-वडिलांना डायबिटिज असेल तर...
डायबिटिज हा आनुवंशिक आजार आहे. पालकांमार्फत मुलांमध्ये येण्याची शक्यता असते. आई-वडिलांनी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे, आपल्या जीवनशैलीत बदल करावा, आनंदी राहावे, नियमित व्यायाम करावा.
काय आहेत लक्षणे?
बाळ सातत्याने खात असेल, सारखे पाणी पीत असेल, डायपर ओले करीत असेल, शरीरावर जखम झाल्यास ती लवकर भरून येत नसेल, तर ही डायबिटिज टाइप-१ ची लक्षणे आहेत.
बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात...
बाळ सातत्याने डायपर ओले करीत असेल, तर पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
-डॉ. विकास चरखे, बालरोगतज्ज्ञ