आठ किलो चांदी असलेली पिशवी महिलेने केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:47 PM2017-10-24T18:47:15+5:302017-10-24T18:47:33+5:30

A bag of eight kilograms of silver has been made by the woman | आठ किलो चांदी असलेली पिशवी महिलेने केली लंपास

आठ किलो चांदी असलेली पिशवी महिलेने केली लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देचिखली येथे संशयित महिला सीसीटीव्हीत कैद

चिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातील
काऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेली
चांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३
आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी महिला
दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे.
चिखली शहरातील सराफा व्यावसायीक भगवान पितांबर वाळेकर यांनी पोलिसात
दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, २३ आॅक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे आपले
डीपी रोडवर असलेले श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले. त्यानंतर
काऊंटरवर आठ किलो चांदीच्या दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यामध्ये तोरड्या,
पाटल्या यासह इतर अनेक दागिन्याचा समावेश होता. साफ सफाई करण्यासाठी
दुकानाच्या आतील बाजूस असलेली झाडणी आणण्यासाठी गेलो असता काऊंटरवर
ठेवलेली दागिन्यांची पिशवी लंपास झालेली आढळून आली. त्यानंतर आसपासच्या
दुकानदाराकडे चौकशी केली असता दुकानाच्या आसपास काही अज्ञात महिला
संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी
परिसरातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक अनोळखी महिला
सदर पिशवी घेऊन जातांना दिसून आली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात
महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गवारगुरु पीएसआय गव्हाणे हे करीत आहेत.
काही दिवसापूर्वी शहरातील एका सोनारास दीड लाख रुपयाचा गंडा घातला होता.
या घटनेची शाई वाळत नाही तोच आज ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे सराफा
व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: A bag of eight kilograms of silver has been made by the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा