‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आता नवे पर्व, दिशा अभियान

By admin | Published: July 11, 2017 12:20 AM2017-07-11T00:20:30+5:302017-07-11T00:20:30+5:30

जिल्हाभर राबविणार उपक्रम : घरोघरी लावणार ‘बेटी बचाओ’चा संदेश देणारे पत्र

'Baiti Bachao, Beti Padhao' is now the new festival, direction campaign | ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आता नवे पर्व, दिशा अभियान

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आता नवे पर्व, दिशा अभियान

Next

किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलैचे औचित्य साधून करण्यात येणार असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देणारे पत्र घरोघरी लावण्यात येणार आहेत.
मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट हा चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीवरूनच ही गंभीर समस्या समोर आली आहे. सुरुवातीपासूनच मुलींच्या जन्मदरात घट होतच आहे, पण, समाजात याबाबत जागरूकता राहिली असती, तर आज मुलींच्या जन्मदराबाबत जे काही भयान चित्र दिसत आहे, ते दिसले नसते. लोकसंख्या वाढीस आळा घालणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून शासन चालत होते. लोकसंख्या वाढीला नियंत्रण करणे हेच एकमेव उद्दिष्ट शासनाने ठेवले. यामुळे मुलींच्या जन्मदराकडे तितकेसे लक्ष दिले गेले नाही. यामुळे गर्भलिंग चाचणी करून जन्माआधीच तिची जीवनयात्रा संपविणे हे सर्रास सुरू होते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या, त्यात एकात्मिक बाल विकास योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. १८ हजार कोटींहून अधिक खर्च या योजनेत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते.
तरीही पाहिजे तसा मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत नाही. यामुळे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरीचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आवाहन पत्र देण्यात येणार आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत स्टिकर्स जिल्हाभर घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गाडीवर झळकले ‘स्वागत लेकीचे’!
११ जुलैपासून घरोघरी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे पत्र लावण्यात येणार आहे. त्यानुसार मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शेंदला येथील वैद्यकीय अधिकारी प्रवीणकुमार निकस यांनी आपल्या गाडीला ‘स्वागत लेकीचं, स्वागत समानतेचं’ हे स्टिकर लावून जिल्ह्यासाठी एक आशादायी चित्र असल्याचा संदेश दिला आहे.

मुलींचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. त्यामध्ये १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरीचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे आवाहन पत्र देण्यात येणार आहे.

११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. अनंत पबितवार,
तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.

Web Title: 'Baiti Bachao, Beti Padhao' is now the new festival, direction campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.