देऊळगावात बालाजी महोत्सव:लाटामंडपाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 01:43 PM2019-10-07T13:43:33+5:302019-10-07T13:44:37+5:30
लक्ष्मी रमण गोविंदाची गर्जना करीत भक्तीभावाने बालाजी मंदिरासमोर असलेल्या दगडी फरसावर लाटा मंडपाची उभारणी करण्यात आली.
- अर्जुनकुमार आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा: सुमारे पावणे चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या देऊळगाव राजातील प्रति तिरुपती श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवातील महत्त्वाचा भाग मानल्या गेलेल्या लाटा मंडपाची भक्तिभावाने उभारणी करण्यात आली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता मंडप उभारण्यास सुरूवात झाली. मंदिरातील घंटानाद व प्रवेशद्वारावरील नगाऱ्यांचा गजर आणि फरसावरील भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन केलेल्या गोविंदा... गोविंदा...गोविंदाच्या जयघोषाने हजारो भाविकांनी लक्ष्मी रमण गोविंदाची गर्जना करीत भक्तीभावाने बालाजी मंदिरासमोर असलेल्या दगडी फरसावर लाटा मंडपाची उभारणी करण्यात आली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या देऊळगाव राजातील श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवाला अश्विन शु.१ घटस्थापनेपासून सुरुवात झाली. श्री व्यंकटेश बालाजी महाराजांच्या या ऐतिहासिक व पारंपारिक उत्सवातील महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव म्हणजे लाटा मंडप उभारणी, रविवारी सकाळी अकरा वाजेपासून मंडपाला दोरीने गुंफणे व भुयारातील २१ महाकाय लाटा बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते, दुपारनंतर भाविकांनी मंडप उभारणीसाठी फरसावर गर्दी केली होती. एकवीस महाकाय सागवानी लाटा व ४२ मंडपाला अखंड दोरीत बांधून शेकडो भाविकांच्या उपस्थित भक्तीभावाने उभारण्यात येणारा देऊळगाव राजा बालाजींचा हा एकमेव उत्सव आहे. दुपारी साडेतीन नंतर मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारा वरील नगार्यांच्या गजर आणि या बरोबरच 'बोल बालासाहेब की जय', ‘लक्ष्मी रमणा गोविंदा’च्या जयघोषात भाविकांनी लाटामंडप उभारण्यास सुरुवात केली. महाद्वार वेशी लगत असलेल्या हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थान समोरील गरुडाच्या दगडी मुर्तीला दोर बांधून अखंड दोरीत ४२ मंडप २१ सागवानी लाटांवर गुंफून उभारत असताना लाटांवर नारळांचा होणारा वर्षाव आणि श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ प्राप्त करण्यासाठी त्यावर तुटून पडलेले भाविक हा प्रसंग लाटा उभारण्यादरम्यान अनेकदा पहावयास मिळाला. या धार्मिक उत्सवात सर्वधर्म समभाव पहावयास मिळतो.
मंडप उत्सवादरम्यान सर्वधर्म समाज बांधवांना वहिवाटीद्वारे मान दिला जातो. आपल्यावर असलेली जबाबदारी सर्वजण हक्काने पार पाडतात. शेकडो भाविकांच्या सहभागाने लाटा मंडप भक्तीभावाने उभारण्यात आला. सुमारे सात तास चाललेल्या मंडप उभारणीच्या धार्मिक परंपरे दरम्यान भाविकांमधील भक्तिभाव शिगेला पोहोचला होता.
आज मध्यरात्री निघणार पालखी
श्री बालाजी महाराजांचा पालखी सोहळा सोमवारला नगर प्रदक्षिणेसाठी मध्यरात्री मंदिरासमोरून निघणार आहे. अठरा ते वीस तास चालणाºया पालखी सोहळ््यादरम्यान अठरा पगड जातीधर्माच्या भाविकांना प्रत्यक्ष बालाजी महाराजांच्या मूतीर्ला स्पर्श करून दर्शन घेता येत असल्याने हजारो भाविक पालखीला हजेरी लावत असतात.