बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:33+5:302021-09-02T05:13:33+5:30
कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. ३० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता घरोघरी ...
कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. ३० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भक्तांनी पाळणा सजावट करून श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव घरातच साजरा केला. काही महिलांनी एकत्र येऊन पाळणा म्हणून हा उत्सव थाटात साजरा केला.
बुलडाण्यातील पंचकृष्ण मंदिरात गोविंदाचा जयघोष..
श्री गोपाल आश्रम येथील श्री पंचकृष्ण मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा रात्री १२ वाजताच्या दरम्यान पार पडला. मंदिराची आकर्षक रोषणाई करून संपूर्ण मंदिर सजावट केली होती. रात्री बारा वाजता महंत आचार्य लोणारकर मोठे बाबाजी यांच्या हस्ते श्रीकृष्णमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीकृष्णाचा भव्य पाळणा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पूजन करण्यात आले. या वेळी आश्रमामधील सर्व साधुसंत महंत उपस्थित होते. सोबत आचार्य पाथ्रीकर बाबा व महंत सोनाळकर बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर आरती, श्रीकृष्णाचा पाळणा झाला. भजन म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.