शैक्षणिक,धार्मिक संस्थांजवळ निवडणूक कार्यालय उभारण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:02 PM2019-03-16T15:02:12+5:302019-03-16T15:02:20+5:30
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा २०१९ चा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोबतच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. त्यानुषंगाने आचार संहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा २०१९ चा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोबतच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. त्यानुषंगाने आचार संहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाना, शैक्षणिक संस्था या पासून २०० मीटरच्या आत कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार यांनी तात्पुरते कार्यालय उभारू नये, अशा स्पष्ट सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यासोबतच सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर, कोणत्याही धार्मिक ठिकाणी किंवा अशा धार्मिक ठिकाणांच्या जागेत, कोणत्याही शैक्षणिक संस्था, रुग्णालयाला लागून अथवा विद्यमान मतदान केंद्राच्या २०० मीटरच्या आत कोणतेही अतिक्रमण करून कार्यालयात उघडता येणार नसल्याचेही अधोरेखीत करण्यात आले आहे.
दुसीकडे अशा कार्यालयंवार पक्ष चिन्ह, छायाचित्रे असलेला केवळ एकच पक्ष ध्वज आणि बॅनर लावता येणार आहे. अशा कार्यालयांमध्ये वापरण्यात येणार्या बॅनरचा आकार स्थानिक कायद्याद्वारे फलक, जाहिरात फकल आदीहून लहान आकारात विहीत केलेला असले याची काळजी घेणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रीया संहीता कलम १४४(१) या आदेशान्वये जिल्ह्यात उपरोक्त नियम लागू करण्यात आले आहेत. हा आदेश २७ मे २०१९ च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भरातीय दंड संहीतेच्या कलम १८६० च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
मत देऊन परतणाऱ्यांना मंडपात प्रवेश नाही
मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. सोबतच मंडप सांभाळणार्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणार्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करू नये किंवा मतदाराला दुसर्या उमेदवाराच्या मंडपात जाण्यास प्रतिबंध करू नये. मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या आतील भागात कोणासही जमाव करता येणार नाही. मतदारावर मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास दबाव आणू नये यासह अन्य काही मार्गदर्शक सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.