मुंबई येथील बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव फसला, एक आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 10:50 AM2018-06-17T10:50:53+5:302018-06-17T10:50:53+5:30

मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.

Bank Manager kidnap News | मुंबई येथील बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव फसला, एक आरोपी अटकेत

मुंबई येथील बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव फसला, एक आरोपी अटकेत

Next

डोणगाव -  मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. या प्रकरणामागे मुंबई परिसरात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींचे अपहरण करणारे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुळचे उत्तरप्रदेशातील परंतु नोकरीनिमित्त मुंबई येथे राहणारे डीसीबी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक राजेशकुमार फुलचंद मोर्या हे १५ जून रोजी रात्री ९ वाजता आपल्या मांडा टिटवाळा वेस्ट येथील घरी जात असताना पांढ-या रंगाच्या एमएच ०४-जीडी ७९१२ या क्रमांकाच्या  स्विफ्ट कारमधून आलेल्या ४ व्यक्तींनी त्यांना पकडून कारमध्ये टाकले व कसारा येथे मद्रासी बोलणारे देवेंद्र व कालिसा असे दोन व्यक्ती उतरले. त्यानंतर याठिकाणी पुन्हा एका आरोपी कारमध्ये बसला. त्यानंतर कार १६ जून रोजी दुपारी २ वाजेदरम्यान मेहकर परिसरात आणल्यानंतर डोणगाव येथे वाहतुकीची कोंडी झाल्याने बँक सहाय्यक व्यवस्थापक राजेशकुमार मोर्या हे कारचा दरवाजा उघडून पळाले.
त्यानंतर रस्त्यावर असणा-या डोणगाव पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण अपहरणाची माहिती दिली. यावेळी एएसआय अशोक नरोटे यांनी ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहका-यांसह कारचा पाठलाग केला. तसेच अपहरणाची माहिती बुलडाणा, अकोला व वाशिम कंट्रोल रूमला माहिती दिली.  दरम्यान कार चालकाने कार परत मेहकरकडे वळविल्याने मेहकर पोलिसांच्या सहकार्याने सदर कार आरोपी चालकांसह ताब्यात घेतली. या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अपहरण करणारे रॅकेट असल्याची शक्यता
ज्या कारमधून  राजेशकुमार मोर्या यांचे अपहरण केले गेले, त्या कारमधील लोकांना आप कहॉ तक है, असे विचारणा करणारे फोन दर १५ मिनिटाला येत होते. यापूर्वीही मुंबई व इतर परिसरातून अनेक व्यक्तींचे अपहरण झालेले असून त्यामागे मोठ्या पदावर असणा-या व्यक्तीचे अपहरण करणारे राज्यातील मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे.

Web Title: Bank Manager kidnap News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.