‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनही शेतकरी कर्जमाफीला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:59 PM2020-03-06T13:59:38+5:302020-03-06T13:59:54+5:30

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.

Banks also contribute to loan waiver through 'haircut' | ‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनही शेतकरी कर्जमाफीला हातभार

‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनही शेतकरी कर्जमाफीला हातभार

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनशेतकरी कर्जमाफीला हातभार लागणार असून आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर कर्जमुक्ती मिळालेल्याकाही शेतकऱ्यांच्या खात्यात तुलनेने कमी रक्कम जमा झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.
राज्य शासन शेतकºयांच्या कर्जाची रक्कम बँकांना देत आहे. त्यामुळे बँकामधील शेतकºयांची जी खाती ३० सप्टेंबर २०१९, ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१७ रोजी एनपीएमध्ये (नॉन प्रॉडक्टीव्ह असेट्स (अनुत्पादक जिंदगी)) गेली आहेत. त्या खात्यांवरील थकित कर्जाच्या रकमेपैकी अनुक्रमे १५ टक्के, ३० टक्के आणि ४५ टक्के रक्कम ही बँकांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले व त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली परंतू ती प्रत्यक्षात झालेल्या कर्जमाफीच्या तुलनेत कमी असली तरी त्याबाबत शेतकºयांनी घाबरून जावू नये.
ती रक्कम बँका सोसणार असल्याचे असे बँकिंग क्षेत्रातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. यासंदर्भात राज्य शासन आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीमध्ये एक करारही झालेला आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ६६६ शेतकºयांची कर्जखाती अपलोड झालेली असून यापैकी एक लाख ४६ हजार ८०० शेतकºयांच्या कर्जखात्याचे विशिष्ट क्रमांक उपलब्ध झालेले ओत. दरम्यान, यापैकी एक लाख दोन हजार ९४० खात्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे तर ४३ हजार ८५९ शेतकरी कर्ज खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे.
दुसरीकडे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या १६ हजार १६० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले असून पैकी १५ हजार ६५ शेतकºयांच्या कर्जमाफीचे ९५ कोटी ६६ लाख रुपये जिल्हा बँकेकडे वर्ग झाले आहेत.


काय आहे ‘हेअर कट’!
राज्य शासन शेतकºयांच्या कर्जापोटी बँकांना पैसे देणार आहे. त्यामुळे बँकांचा एनपीए कमी होऊन बँकांची आर्थिक सक्षमता वाढले. परिणामी ज्या शेतकºयांची खाती ही ३० सप्टेंबर २०१९ ला एनपीएत गेली त्या शेतकºयाच्या कर्जापैकी १५ टक्के रक्कम बँकेला सोसावी लागणार आहे. ३१ मार्च २०१८ रोजी खाते एनपीए झालेले अल्यास बँकेला ३० टक्के तर ३१ मार्च २०१७ ला खाते एनपीए झाले असल्यास ४५ टक्के रक्कम ही बँकेला सोसावी लागणार आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि राज्य शासनास यांच्यात करार झालेला आहे. वाणगी दाखल सांगायचे झाल्यास जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा संचित तोटा शेतकरी कर्जमाफी माफीची रक्कम बँकेस मिळाल्यामुळे १०० कोटींनी कमी होणार आहे. वसूल न होणारी रक्कम बँकांना मिळत असल्याने बँकांनीही या ‘हेअर कट’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीच्या रकमेपेक्षा कमी रक्कम जमा झाली असल्यास त्यांनी घाबरून जावू नये, ही तफावतीची रक्कम बँकांकडूनच भरण्यात येणार आहे.

Web Title: Banks also contribute to loan waiver through 'haircut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.