बॅंकांमध्ये लागतात ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:40+5:302021-05-05T04:56:40+5:30
बाजारपेठेत गर्दी कमी व्हावी, यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ...
बाजारपेठेत गर्दी कमी व्हावी, यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बॅंकांच्या वेळाही कमी केल्या असून, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डोणगांव येथे भारतीय स्टेट बँक शाखा असून, दुसरी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. संचारबंदीत बँक ११ ते २ वाजेपर्यंत सुरू राहात असल्याने बँकेत ग्राहकांची गर्दी हाेत आहे. स्टेट बॅंकेच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी बाहेर मंडप टाकण्यात आला असला तरी गाहक मात्र बँकेत गर्दी करताना दिसून येत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत मात्र मुख्य दरवाजा बंद करून प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची बॅंकेच्या मुख्य दरवाजाजवळ गर्दी हाेत आहे. विदर्भ बॅंकेने ग्राहकांना कोणतीही सुविधा न दिल्याने ग्राहकांना बँकेबाहेर उन्हात उभे राहावे लागत आहे. विदर्भ काेकण ग्रामीण बॅंकेसमाेर ग्राहकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्याची मागणी हाेत आहे.