वेळ कमी असल्याने बॅंकांमध्ये लागतात ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:55 AM2021-05-04T11:55:53+5:302021-05-04T11:56:13+5:30
Crowd in Banks : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत़ बँकांची वेळही कमी करण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे़. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़. त्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़.
गत काही दिवसांपासून राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत आहे़ वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत़ यामध्ये १५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ तसेच बँकाची वेळही कमी करण्यात आली आहे़. बँकांचे कामकाज सकाळी ११ ते २ पर्यंतच असल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची माेठी गर्दी हाेत आहे़. अनेक बँकांसमाेर रांगा लागत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे़. बँकांकडून विविध उपाययाेजना करण्यात येत असल्या तरी माेठ्या प्रमाणात हाेत असलेली गर्दी राेखण्यात त्यांना अपयश येत आहे़. त्यामुळे, शासनाने बँकाच्या वेळा वाढवण्याची गरज आहे़.
सध्या ग्राहकांच्या हितासाठी कोरोनाकाळात बँकेत फक्त नगदी रोकड काढणे व इतरत्र पाठविणे हे आवश्यक व्यवहार बँकेमार्फत सुरू आहेत़ नागरिकांनी इतर कामासाठी बँकेत येऊ नये व गर्दी करू नये़ तसेच कोविडच्या नियमांचे पालन करावे.
- अमोल नाफडे, शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया डोणगाव