फसवणूक टाळण्यासाठी बँकांची भूमिका महत्वाची - महामुनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:25 PM2018-07-22T14:25:56+5:302018-07-22T14:26:59+5:30
फसवणूक टाळण्यासाठी बँकांची भूमिका महत्वाची असून जनतेमध्ये जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी केले.
बुलडाणा : लॉटरी लागली म्हणून नंबर मागणारे फोन येतात. मोठा पैसा मिळणार म्हणून ग्राहक आपला खाते क्रमांक सहज देतात. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे समजते. फसवणूक टाळण्यासाठी बँकांची भूमिका महत्वाची असून जनतेमध्ये जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी केले. शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी बँकींग जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डीवायएसपी बी.बी.महामुनी होते. या कार्यशाळेला स्टेट बँक, बुलडाणा अर्बन, आणि इतर बँक व पतसंस्थांचे व्यवस्थापक व नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शहर ठाणेदार यु.के.जाधव यांनी करुन आयोजनामागची भूमिका मांडली. ते म्हणाले, आज व्यवहार आॅनलाईन झाल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. गुन्हेगारांनी याही क्षेत्रात मजल मारत अनेकांना फसविले आहे. यासाठी जाणिव जागृती महत्वाची आहे. यावेळी उपस्थित बँक अधिकाºयांनीही काही सूचना व अनुभव मांडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास ग्राहकांनी तत्काळ संपर्क करावा,म्हणजे भविष्यकालीन फसवणूक टाळता येईल. ग्राहकाचा व्यवहार चोख असेल तर फसवणूक शक्यतो होत नाही. पण कोड नंबर, अकांऊट नंबर लिक होणे हा मोठा दोष असतो, असे बँक अधिकाºयांनी सांगितले. यावेळी पीएसआय मनोज सुरवाडे, पीएसआय जंजाळ यांच्यासह बँक अधिकारी, पतसंस्थांचे व्यवस्थापक, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.