२६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:50 PM2022-08-20T14:50:50+5:302022-08-20T14:51:15+5:30

कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांचे धाबे दणाणले.

Banned Gutkha worth 26 lakh caught action of the Upper Superintendent of Police buldhana maharashtra | २६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

२६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

googlenewsNext

खामगाव: प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून तब्बल २६ लाख रुपयांचा सुंगधीत गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. यात वाहनासह तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे.

अपर पोलीस अधीक्षक पथकानी पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांना जळगाव खान्देश येथून लोणार येथे एका ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने लोणार फाटा मेहकर येथे नाकाबंदी करुन ट्रक पकडला. या ट्रकची झडती घेतली असता त्यात २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा सुगंधी गुटखा, पान मसाल्याचा साठा आढळला. पोलिसांनी अवैध गुटखा आणि वाहन असा एकूण ४०,९५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार दोन्ही रा. जळगाव खान्देश, गजानन मापारी रा. लोणार यांच्या विरुद्ध मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या नेतृत्वात पोउपनी पंकज सपकाळे आणि अपर पोलीस अधीक्षक पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Banned Gutkha worth 26 lakh caught action of the Upper Superintendent of Police buldhana maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.