‘बाप्पाला’ भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2016 02:52 AM2016-09-16T02:52:36+5:302016-09-16T02:52:36+5:30

खामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत.

'Bappa' emotional message | ‘बाप्पाला’ भावपूर्ण निरोप

‘बाप्पाला’ भावपूर्ण निरोप

googlenewsNext

खामगाव, दि. १५ : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला मिरवणूक काढून वाजतगाजत उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९.३0 वाजता मानाचा लाकडी गणपती मंदिरात अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांच्या हस्ते आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मानाचा लाकडी गणपती फरशी भागात आल्यानंतर शहरातील मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीमध्ये अग्रभागी मानाचा लाकडी गणपती, त्यानंतर तानाजी गणेश मंडळ शिवाजीनगर, हनुमान मंडळ सतीफैल, राणा मंडळ दाळफैल, त्रिशुल मंडळ शहीद भगतसिंग चौक, सिंधी मंडळ सिंधी कॉलनी, तेलगुराज मंडळ रावण टेकडी, चंदनशेष मंडळ शाळा नं ६, दत्तगुरु मंडळ घाटपुरी नाका, वंदे मातरम मंडळ गांधी चौक, जगदंबा मंडळ बाळापूर फ ैल, जय बजरंग मंडळ गोपाळनगर, श्रीकृष्ण मंडळ बुरुड गल्ली, सराफा मंडळ सराफा, जय संतोषी मॉ मंडळ फरशी, स्वामी मंडळ फरशी, आदर्श मंडळ सनी पॅलेसजवळ, रामदल मंडळ शिवाजी वेस, एकता मंडळ सिव्हिल लाइन, क्रांती मंडळ आठवडी बाजार, वीर हनुमान मंडळ शंकरनगर, नेताजी मंडळ जलालपुरा, माँ आत्मशक्ती मंडळ जलंब नाका, अमरलक्ष्मी मंडळ बालाजी प्लॉट, राष्ट्रीय मंडळ लक्कडगंज, जय भवानी मंडळ चांदमारी अशी २६ मंडळं सहभागी झाली होती. यावर्षीही निर्मल टर्निंग ते फाटकपुरा भागात कलम १४४ (३) हे कलम लावण्यात आले होते. या कलमानुसार पोलीस परवानगी, बंदोबस्तावरील कर्मचारी तसेच पूर्वपरवानगीशिवाय गणेश मंडळ कार्यकर्त्यांना फिरण्यास मनाई करण्यात आली होती. यावर्षी निर्मल टर्निंगपासून एक-एक मंडळ याप्रमाणे फाटकपुरा भागापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. फाटकपुरा भागातून पुढील मंडळ निघून गेल्यानंतर निर्मल टर्निंग येथून नंतरच्या मंडळाला प्रवेश देण्यात आला.

Web Title: 'Bappa' emotional message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.