ट्रान्सफार्मर फुटल्याने खामगाव येथे ‘बत्ती गूल’
By Admin | Published: October 3, 2016 02:53 AM2016-10-03T02:53:26+5:302016-10-03T02:53:26+5:30
रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
खामगाव(जि. बुलडाणा), दि. २- शहराला वीजपुरवठा होणार्या महापारेषणच्या १३२ के.व्ही. सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर फुटल्याने खामगाव शहरातील काही भागातील वीजपुरवठा दुपारी ३.३0 वाजतापासून खंडित झाला होता. रात्री ८.१५ वाजेपर्यंतदेखील वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य होते.
खामगाव शहराला महापारेषण कंपनीच्या शेगाव रोडवर असलेल्या १३२ के.व्ही. सबस्टेशनमधून वीजपुरवठा करण्यात येतो. या सबस्टेशनमधील खामगाव टाऊन भागात वीजपुरवठा करणार्या फिडरवरील ट्रान्सफार्मर दुपारच्या वेळी फुटले. यामुळे शहरातील टाऊन फिडर अंतर्गत येणार्या भागात वीजपुरवठा खंडित झाला. मध्यंतरी अर्धा तास वीजपुरवठय़ानंतर पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. अकोला येथे ट्रान्सफार्मर आणल्यानंतर रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला.
महापारेषणमधील ट्रान्सफार्मर ओव्हर लोड झाल्याने फुटले. त्यामुळे शहरातील खामगाव टाउन फिडरवरील वीज पुरवठा बंद झाल्याने तातडीने अकोला येथून ट्रान्सफार्मर बोलाविण्यात आल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
- अजय शिंदे
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, खामगाव विभाग