सावधान! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:33+5:302021-09-18T04:37:33+5:30
अशी होते ऑनलाईन फसवणूक... १) कधीकधी बऱ्याच आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना फसविले जाते, तर काही वेळा चुकीची ऑर्डर देऊन ...
अशी होते ऑनलाईन फसवणूक...
१) कधीकधी बऱ्याच आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना फसविले जाते, तर काही वेळा चुकीची ऑर्डर देऊन फसवणूक केली जाते. कारण या ऑफरमध्ये नमूद केलेल्या किंवा दर्शविलेल्या ऑफर बऱ्याच वेळा चुकीच्या असतात. त्यांचा मुख्य हेतू लोकांना फसविणे हा असतो. यानंतर, इतरही बरेच मार्ग आपल्यासाठी फसवणारे ठरू शकतात.
२) काही वेळा ग्राहकांना वस्तू दाखविण्यात येतात. मात्र, डिलेव्हरीआधीच ग्राहकांडून पैसे मागविले जातात. पैसे ऑनलाईन पद्धतीने मागवूनही, त्या ग्राहकांना वस्तू दिल्या जात नाहीत. तसेच काहीवेळा पैसे घेऊन खराब किंवा बऱ्याच वेळा दुसऱ्याच वस्तू पाठविल्या जातात.
अशी घ्या काळजी...
माहितीच्या आणि विश्वासार्ह वेबसाईटवरून खरेदी करा, एसएसएल असलेल्या साईट्सद्वारेच खरेदी करा, कारण या वेबसाईट्स यूजर्सने इनपुट केलेला डेटा संग्रहित करण्यास अधिक सक्षम आहेत. या साईट्स ओळखणे सोपे आहे, कारण त्या एचटीटीएऐवजी एचटीटीपीएस ने सुरू होतात आणि त्यांच्या ॲड्रेस बारमध्ये लॉक पॅडलॉक चिन्ह असते.
वेबसाईटचे लुक्स बघून खरेदी करू नका. अनेकदा वेबसाईट दिसण्यास आकर्षक दिसते, मात्र यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्हाला अशा साईट्स ओळखायच्या असतील, तर प्रोडक्ट्सच्या माहितीत आणि वेबसाईटवर शब्दांमध्ये तुम्हाला अनेक चुका आढळतील.