काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:16+5:302021-02-24T04:35:16+5:30
काेराेना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र लावा मेहकर : शहरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने नगरपालिकेने व्यावसायिकांना काेराेना चाचणी करण्याचे आवाहन केले ...
काेराेना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र लावा
मेहकर : शहरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने नगरपालिकेने व्यावसायिकांना काेराेना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुकानदारांनी काेराेना चाचणी निगेटिव्ह आली असल्यास तसे प्रमाणपत्र दुकानाच्या बाहेर लावावे, असे आवाहन केले.
आरडव ग्रामपंचायतीला सुंदर गावाचा पुरस्कार
लाेणार : तालुक्यातील आरडव ग्रामपंचायतीला सुंदर गाव पुरस्कार नुकताच जिल्हा परिषद कार्यालयात प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र आरडवच्या सरपंच शाेभा आसाराम जायभाये, ग्रामसेवक कारभारी शिंगणे व ग्रा.पं. सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिनगाव जहांगीर येथे शिवरायांना अभिवादन
देऊळगावराजा : तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्रीकृष्ण बंगाळे हे होते. या वेळी मनमोहन बंगाळे, दिनकर पठाडे, दिनकर बंगाळे, सुरेश गोरे आदींची उपस्थिती होती.
हरभरा साेंगणीसाठी मजूरच मिळेना
धामणगाव धाड : परिसरात हरभरा साेंगणीस सुरुवात झाली आहे. मुबलक पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा व इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या हरभरा साेंगणी सुरू झाली असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शिवजयंती उत्साहात साजरी
किनगाव जट्टू : स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी लक्ष्मण काळबांडे, ग्रामविकास अधिकारी अविनाश नवले, नवनिर्वाचित उपसरपंच समाधान मुळे, ग्रामपंचायत सदस्य अनिसखा पठाण, राजू सानप आदी उपस्थित होते.