ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच होऊ शकतो खिसा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:51+5:302021-09-15T04:39:51+5:30

मॅट्रोमोनी वेबसाइट्सचा जर तुम्ही वर किंवा वधू शोधण्यासाठी वापर करीत असाल तर आजच तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण, ...

Be careful when looking for a mate online, pockets can be emptied before the hands turn yellow | ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच होऊ शकतो खिसा रिकामा

ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच होऊ शकतो खिसा रिकामा

Next

मॅट्रोमोनी वेबसाइट्सचा जर तुम्ही वर किंवा वधू शोधण्यासाठी वापर करीत असाल तर आजच तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण, या साइटसचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, अनेकांची फसवणूकही होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात असा काही प्रकार घडला नाही. मात्र, जिल्ह्यालगत असलेल्या अकोला, जालना, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये केवळ मुलांचीच नाही तर मुलींचीही फसवणूक होत असल्याने दोन्हीकडील मंडळींनी सावध होण्याची वेळ आली आहे.

ही घ्या काळजी

मॅट्रोमोनियल वेबसाइट्सवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ई-मेल आयडीचा वापर करावा. यासोबतच मॅट्रोमोनियल वेबसाइट्सवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खाजगी गोष्टी शेअर करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सरकारने युजर्सला सूचना दिली आहे की, कोणत्याही मॅट्रोमोनी वेबसाइट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यासाठी वेबसाइटचे रिव्ह्यूज वाचावे आणि कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र आणि कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या.

अशी होते फसवणूक

मॅट्रोमोनियल वेबसाइट्सद्वारे फ्रॉड करणारे कोणतीही इमर्जंसी असल्याचे सांगून पैसे खात्यात टाकण्यास सांगतात. तसेच गिफ्ट पाठवले असून त्यासाठी टॅक्स मनी ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक करतात. तर वर आणि वधूचे फोटो जे की खोटे असतात, त्यांचा पत्ता संपर्क क्रमांक याचा कुठलाही ताळमेळ नसतो, अशांची माहिती पुरवून तुमची फसवणूक केली जाते.

कोणतीही लिंक डाऊनलोड अथवा फाॅरवर्ड करण्याआधी विचार करा, अधिकृत साइटलाच भेट द्या, पैशाचे व्यवहार करताना त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा, विवाहासंबंधी गोष्टीमध्ये मध्यस्थी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यापेक्षा प्रत्यक्ष स्थळाला भेट द्या.

-अनिल बेहेरानी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, बुलडाणा.

Web Title: Be careful when looking for a mate online, pockets can be emptied before the hands turn yellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.