संत चोखोबा यांच्या जन्मस्थळाचा अभिमान बाळगा : खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:41+5:302021-01-16T04:38:41+5:30

ते १४ जानेवारी रोजी संत चाेखाेबांच्या जन्मोत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते. सध्या देशभरात कोरोनाचे संकट असल्याने याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीच्या ...

Be proud of the birthplace of Saint Chokhoba: Khillare | संत चोखोबा यांच्या जन्मस्थळाचा अभिमान बाळगा : खिल्लारे

संत चोखोबा यांच्या जन्मस्थळाचा अभिमान बाळगा : खिल्लारे

Next

ते १४ जानेवारी रोजी संत चाेखाेबांच्या जन्मोत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते.

सध्या देशभरात कोरोनाचे संकट असल्याने याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने याठिकाणी संत चोखोबा यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त पालखी व मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. या ठिकाणी संत चोखोबा यांचे मूर्तीचे पूजन जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कमलताई बुधवत, मतदारसंघाचे माजी आ. डॉ शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य शीला शिपणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काजी, पंचायत समितीच्या सभापती रेणुका बुरकूल, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई खेडेकर, डी. टी. शिपणे, प्रा. कमलेश खिल्लारे, गजानन पवार, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इंगळे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव यांच्या भागवत संप्रदायामुळे चंद्रभागेच्या तिरी आध्यात्मिक लोकशाही सुरू झाली होती, याठिकाणी सर्व जातीधर्माचे संत जमत कीर्तन करत. परंतु मंदिरात जाण्यासाठी जातीची आवश्यकता होती. त्यामुळे जन्मभर संत चोखोबांना विठ्ठल मंदिरात जाता आले नाही, दर्शन करता आले नाही ते उपेक्षित राहिले. मात्र आपल्या परिसरातील जनतेनी त्यांचे जन्मस्थळ असल्याचा अभिमान बाळगलाच पाहिजे, असे मत हवा, प्रा. कमलेश खिल्लारे यांनी व्यक्त केले.

Web Title: Be proud of the birthplace of Saint Chokhoba: Khillare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.