नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

By admin | Published: May 30, 2017 12:19 AM2017-05-30T00:19:50+5:302017-05-30T00:19:50+5:30

जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Be Watchful for Natural Disasters! | नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाइफ बोट, लाइफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करून मुख्यालयी साधनसामग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थलांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल, याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जाऊन तातडीने पंचनामे करून कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे, याची तपासणी करावी. तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील, याची २४ तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तशा प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्रामपंचायत व तालुका स्तरावर प्रथमच करून ठेवावी. पूर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखाद्या प्रकल्पातून परत येणाऱ्या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावित होणाऱ्या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सूचना देताना जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले, पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होते व रोगराई पसरते. यापासून संरक्षण मिळावे व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा असावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता करून ठेवावी, आदी सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या.

Web Title: Be Watchful for Natural Disasters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.