शेतीचे तारांचे कुंपण तोडून विवाहितेस मारहाण

By अनिल गवई | Published: July 4, 2024 01:28 AM2024-07-04T01:28:38+5:302024-07-04T01:29:01+5:30

...हा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारात घडला. याप्रकरणी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Beating the married woman by breaking the wire fence of the farm | शेतीचे तारांचे कुंपण तोडून विवाहितेस मारहाण

शेतीचे तारांचे कुंपण तोडून विवाहितेस मारहाण

खामगाव: शेतीचे तारेचे कुंपण तोडून एका विवाहितेस तिच्या पतीसमोर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारात घडला. याप्रकरणी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, श्वेता अनंता शेगोकार ३४, रा. गारडगाव या विवाहितेचे अंत्रज शिवारात शेत आहे. या शेतात ती पतीसोबत हजर असताना शेताशेजारी शेत असलेले आणि रामनगर येथील विश्वनाथ सखाराम काळुसे, दत्तात्रय सखाराम काळुसे, सचिन विश्वनाथ काळुसे, शुभम दत्तात्रय काळुसे यांनी शेगोकार यांच्या शेताचे तारेचे कुंपण तोडून नुकसान केले. या नुकसानाबाबत हटकले असता, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच वाईट उद्देशाने तिचा डावा हात ओढला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, २९६, ३२४(४),(५), ११५(२), ३५२, ३५१ (२), (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.

 

Web Title: Beating the married woman by breaking the wire fence of the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.