बांधकाम साहित्य देण्याच्या कारणावरून मारहाण; चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ब्रह्मानंद जाधव | Published: August 10, 2023 01:16 PM2023-08-10T13:16:54+5:302023-08-10T13:17:37+5:30

याप्रकरणी गुरूवारी चार जणांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

beatings for giving construction materials; A case of atrocity has been registered against four persons | बांधकाम साहित्य देण्याच्या कारणावरून मारहाण; चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बांधकाम साहित्य देण्याच्या कारणावरून मारहाण; चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

 

बुलढाणा : बांधकाम साहित्य मागण्याच्या कारणावरून येथील इंदिरानगर, धाड नाका परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी चार जणांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदा प्रकाश हिवाळे यांच्या पतीला गुड्डू उर्फ शें अनीम शे अमजद याने बांधकामाचे साहित्य मागितले. तेव्हा प्रकाश हिवाळे यांने मला काम आहे, स्ट्रेटिंगचे सामान तुला देऊ शकत नाही असे म्हटले असता त्याने हिवाळे यांना शिवीगाळ केली. तसेच इतर तीन आरोपींना फोन करून बोलावून घेतले. तेव्हा तिची भाची सोडविण्यास आली असता चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, शेजारचे भांडण सोडविण्यास आले असता दगड फेकून मारून जखमी केले. याप्रकरणी नंदा प्रकाश हिवाळे (वय ३५, रा. रा. इंदीरानगर, बुलढाणा)
यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी गुड्डू उर्फ शें अनीम शे अमजद (वय २६), शे सोही शे अमजद (वय २२), शे साहील शे, अमजद (वय २२), शे. सलमान से सरदार (वय २७, सर्व रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: beatings for giving construction materials; A case of atrocity has been registered against four persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.