खल्याळ गव्हाण ग्रामपंचायतीला ‘सुंदर गाव पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:28+5:302021-02-25T04:43:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगावराजा : तालुक्यातील खल्याळ गव्हाण, सुलतानपूर गट ग्रामपंचायतीची स्व. आर. आर. पाटील तालुकास्तरीय दहा लाख रूपयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : तालुक्यातील खल्याळ गव्हाण, सुलतानपूर गट ग्रामपंचायतीची स्व. आर. आर. पाटील तालुकास्तरीय दहा लाख रूपयांच्या ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते ग्रामसेवक के. एन. चेके, नवनिर्वाचित सरपंच कविता बद्रीनाथ दंदाले यांनी स्वीकारला.
राज्य शासनाने स्व. आर. आर. पाटील यांच्या नावाने ‘सुंदर गाव’ स्पर्धेचे आयोजन केले होते. यानुसार या स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सन २०१९-२० या वर्षात खल्याळ गव्हाण, सुलतानपूर गट ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. खल्याळ गव्हाण, सुलतानपूर हे गाव चूलमुक्त, हागणदारीमुक्त, पर्यावरणमुक्त, स्वच्छ सुंदर गाव असून, गावात अनेक उपक्रम गावकरी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये गावातील बचतगट व गाव स्तरावरील सर्वच तलाठी, आरोग्यसेवक, कृषी सहाय्यक, पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, वायरमन, रोजगार सेवक, ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व तरुण, युवक, गावकरी तसेच तत्कालिन सरपंच गजानन माधवराव दंदाले, उपसरपंच कालिंदा संतोष काळे, ग्रामपंचायत सदस्य अलकाबाई मोतीराम दंदाले, कुंताबाई श्रीकृष्ण दंदाले, गजानन देवराव दंदाले, सुशांत खंडागळे, अवंतिकाबाई जारे, संजय डोंगरे, देऊबाई रंगनाथ नाडे यांना स्मार्ट गाव होण्यासाठी सहकार्य केले. खल्याळ गव्हाण, सुलतानपूर गट ग्रामपंचायतीला ‘स्व. आर. आर. पाटील आबा सुंदर गाव पुरस्कार’ जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार नवनिर्वाचित सरपंच कविता बद्रीनाथ दंदाले व ग्रामसेवक के. एन. चेके यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.