चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

By admin | Published: December 28, 2014 12:30 AM2014-12-28T00:30:33+5:302014-12-28T00:30:33+5:30

बुलडाण्यातील चौक झाले भकास: संस्थानी पुढाकार घ्यावा.

The beauty of the chakras | चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

Next

बुलडाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाण्याच्या सौंदर्यीकरणाला सध्या अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. शहरातील प्रत्येक चौकाला इतिहास असून, शहराच्या राजकीय, सांस्कृतिक घडमोडीचा केंद्रबिंदू आहे; मात्र या चौकाच्या सौंदर्यीकरणाबाबत पुढाकार घेतला जात नाही. सौंदर्यीकरणाच्या कुठल्याही खाणाखुणा चौकात दिसत नाहीत. अतिशय गजबजलेल्या चौकांना आलेल्या बकालपणामुळे शहराचे सौंदर्य हरविले आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस खोळंबा निर्माण होतो. काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
सौंदर्यीकरणामुळे केवळ चौक सुंदर दिसतो असे नाही, तर चौकातून होणार्‍या वाहतुकीलाही शिस्त लागू शकते. बुलडाणा शहरात अनेक सामाजिक व व्यावसायिक संघटना या कामी पुढाकार घेऊ शकतात. नगरपालिकेने चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी अशा संस्थाकडून सहकार्य घेऊन शहराचे सौंदर्य वाढविणे सहज शक्य आहे. जयस्तंभ, संगम, स्टेट बँक व कारंजा या प्रमुख चौकांसोबतच त्रिशरण चौक, तहसील चौक, भोंडेसरकार चौक अशा चौकांचाही सौंदर्यीकरणाबाबत विचार केला पाहिजे. शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक, पतसंस्थेच्या सहकार्यातून अशा चौकांचे सौंदर्यीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यातही भर पडेल व वाहतुकीलाही शिस्त लागेल. या दृष्टीने पालिकेने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The beauty of the chakras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.