काेराेनामुळे विद्यार्थी घरी, शिक्षक शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:39+5:302021-03-06T04:32:39+5:30
डोणगांव : काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामे करण्यासाठी शिक्षकांना दरराेज ...
डोणगांव : काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामे करण्यासाठी शिक्षकांना दरराेज शाळेत जावे लागत आहे तर दुसरीकडे विद्यार्थी मात्र घरीच आहेत. गत वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
वाढत्या काेराेना रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालेय कामकाज पेपरतपासणीसाठी ५० टक्के उपस्थितीची अट टाकून उपस्थित रहावयास सांगितले आहे. ५० टक्क्यांची अट असली तरी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के आहे. अनेक शिक्षक, कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणांवरून शाळेत एकत्र येतात व कामकाजानंतर परत जातात. त्यांचा एकमेकांशी संपर्क येताे. त्यामुळे, काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे.