मलकापूरात दिव्यांगांचे भिक मांगो आंदोलन
By विवेक चांदुरकर | Published: December 16, 2023 12:50 PM2023-12-16T12:50:57+5:302023-12-16T12:52:00+5:30
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर : संजय गांधी निराधार व श्रावण बाळ वृद्ध योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊन देखील कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या गेल्या पाच ते सहा महिन्यापासून प्रकरणे निकाली न काढल्याने प्रलंबित आहेत. नवीन केसेस सुद्धा १५ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात याव्या यासाठी दिव्यांग मल्टीपर्पस फाउंडेशनच्या वतीने वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मात्र, त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने शहराच्या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत दिव्यांग बांधवांनी भीक मांगो आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. नायब तहसीलदार यांनी प्रश्न सोडवीणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, सचिव शेख रईस, महा.राज्य सल्लागार पंकज मोरे, जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे, जिल्हा महासचिव राजीव रोडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दत्ता नारखेडे, तालुकाध्यक्ष निलेश आढाव, तालुका सचिव रामेश्वर गारमोडे, नांदुरा तालुकाध्यक्ष प्रकाश चोपडे, मोताळा तालुकाध्यक्ष संजय तायडे, सदस्य अंकित नेमाडे, प्रकाश वाघ, प्रवीण पाटील, संतोष लिलाकर, विजय सावळे, सुनील पाटील, अनिल खोलगडे, संतोष तडके, शिवाजी वाघ, गोपाल गुलगे, दामोदर धोरण, अशोक गाढवे, जफरखान व दिव्यांग बांधव उपस्थित होते.