साखरखेर्डात कोविड लसीकरणाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:39+5:302021-03-10T04:34:39+5:30
लसीकरण केंद्रामध्ये कोविड लसीकरणचा पहिला डोज ‘महिला दिनी, मंदाकिनी भागवत सुरुशे यांना देण्यात आला. आरोग्यसेविका मीनाक्षी गवई यांनी पहिला ...
लसीकरण केंद्रामध्ये कोविड लसीकरणचा पहिला डोज ‘महिला दिनी, मंदाकिनी भागवत सुरुशे यांना देण्यात आला. आरोग्यसेविका मीनाक्षी गवई यांनी पहिला डोस दिला. त्यानंतर, दीपक नागरे, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, यांनीही लस घेतली, यावेळी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये कोविडची लस उपलब्ध झाल्यामुळे अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे. सिंदखेडराजा शहराचे अंतर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसाला परवडणारे नसल्याने साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. गेल्या वर्षभरात साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत शेकडो कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण निघाले होते. अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे कोविड तपासणी केंद्र ही सुरू करण्यात आले होते. ८ मार्चपासून लसीकरणाच्या प्रारंभ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या लसीकरणाचे वेळी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे, साखरखेर्डा आरोग्य केंद्राचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सुरूशे, प्रवीण पाझडे, गोपाल मानवतकर, अंकुर देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार दीपक नागरे, माजी उपसरपंच रामदास सिंग राजपूत, इब्राहिम शाहा, सचिन खंडारे, यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी हजर होते.